पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे ( Rupali Patil Thombre ) यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण ( FIR Against Mns Activists In Pune ) सेनेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावर 'एक करोड ताईंवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप' अशा नावाने गृप करून हा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी पुनम काशिनाथ गुंजाळ (27) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
काय आहे प्रकरण? - याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी तक्रारदाराला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यांना त्या गृपवर रूपाली ठोंबरे यांचा फोटो दिसला. विना परवानगी त्यांचा फोटो घेऊन त्याचा वापर करून अश्लील भाषेत खिल्ली उडवत असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारदार यांनी महिलेविषयी अश्लील भाषेत बोलू नका, अशी विनंती केल्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल - तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादंविच्या कलम 354/अ, ड, 500, 34 आयटी कायदा क 66 c 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत