पुणे - चाकण बस स्टॅण्ड जवळील परिसरात दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक ( Female infants found at Chakan bus stand ) आढळले असून या प्रकरणी चाकण पोलिसात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रिक्षा चालक सुजित अजित काळे (वय 24) या तरुणाने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. सर्वात अगोदर सुजित या तरुणाला अर्भक दिसले होते.
अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक सुजित आणि त्यांचा मित्र विनोद भगवान हजारे हे चाकण बस स्टॅण्ड जवळ रिक्षा लावून थांबले होते. तेव्हा, त्यांना काही अंतरावर गर्दी दिसल्याने ते तिथे गेले. रस्त्यालगत गोणपाटात ठेवलेले स्त्री जातीचे अर्भक रडत होते. ते अंदाजे एक ते दोन दिवसांचे होते. त्या स्त्री जातीच्या अर्भकाला रिक्षा चालक सुजित यांनी चाकण पोलीस ठाण्यात घेऊन गेले. स्त्री जातीच्या अर्भकाला मोकळ्या जाग्यात टाकून पळ काढला, याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Taj Mahal : बुरहानपूरच्या 'शाहजहा'ने पत्नीला भेट दिला 'ताज महल'