पुणे- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर ( Narendra Dabholkar murder case ) यांच्या खून प्रकरणाबाबत महत्त्वाची बातमी आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे ( Sachin Andure ) आणि शरद कळसकर ( Sharad Kalaskar ) यांना ओळखले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड आज घडली आहे. आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड घेण्यात आली आहे. यात साक्षीदाराने दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ओळखले आहे.प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आज पुणे न्यायालयात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना खून करताना पाहिले असल्याचा कबुली जबाब दिला आहे. साक्षीदाराने या दोघांना ओळखत न्यायालयात त्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे.
हेही वाचा-डॉ. दाभोलकरांच्या खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले ? अंनिसचा सरकारला सवाल
न्यायालयाचे उर्वरित कामकाज 23 मार्च रोजी होणार
आज साक्षीदारांच्या समोर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात केवळ अर्धीच ओळख परेड झाली आहे. उर्वरित पुढील ओळख परेड होणार 23 मार्चला होणार आहे.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात वीरेंद्र तांवडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर असे एकूण पाच आरोपी आहेत.यातील संजीव पुनाळेकर वगळता सर्व चार आरोपी होते. ते न्यायालयात आज प्रत्यक्ष हजर होते.
हेही वाचा-Narendra Dabholkar: आठव्या स्मृतीदिनी दाभोळकरांना पुण्यातील "त्या" पुलावर श्रद्धांजली
2018 मध्ये गुन्हा दाखल
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याबाबत सरकारला प्रसिद्धीपत्रकातून प्रश्न विचारले होते. खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयितांविरुद्ध अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. या खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे.