ETV Bharat / city

Face to Face : कसा असणार 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प?; जाणून घ्या अजित मंगरुळकर यांच्याकडून - Indian Mercantile Chember director Ajit Mangrulkar

महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. या सर्व मुद्द्यांवर या अर्थसंकल्पामध्ये काय विशेष असू शकत याबाबत आय एम सी (चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) चे व्यवस्थापकीय संचालक अजित मंगरुळकर यांच्याशी खास बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.

Face to Face
Face to Face
author img

By

Published : Jan 29, 2022, 10:51 AM IST

Updated : Jan 29, 2022, 2:21 PM IST

मुंबई - 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा 2022- 23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मागील दोन वर्षांमध्ये करोनाच्या महामारीने संपूर्ण देशात जनता मेटाकुटीला आली आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत, बेरोजगारी वाढली आहे, शेजाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. या सर्व मुद्द्यांवर या अर्थसंकल्पामध्ये काय विशेष असू शकत याबाबत आय एम सी (चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) चे व्यवस्थापकीय संचालक अजित मंगरूळकर यांच्याशी खास बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.

कसा असणार 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प?

प्रश्न - सध्याच्या कोविड सारख्या महामारीमध्ये हा अर्थसंकल्प सादर होत आहे, या अर्थसंकल्पाला तुम्ही कशा पद्धतीने बघता?

उत्तर - यंदाचा अर्थसंकल्प हा विशेष करून वाढ आणि मागणी या दोन गोष्टींवर अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असायला हवा असं मला वाटतं. मागील वर्षभरामध्ये किंवा त्यापूर्वी कोविड सारख्या महामारीने जनतेचे फार हाल झाले आहेत. ते बघता हा अर्थसंकल्प समतोल असणार असे दिसते.

प्रश्न - अर्थसंकल्पा सोबत देशात पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होत आहेत, त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांसाठी प्रलोभन करणारा हा अर्थसंकल्प असेल असे वाटते का?

उत्तर - तसं बघायला गेलं तर निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पामध्ये अशा घोषणांचा पाऊस पाडला जातो. नक्कीच हा अर्थसंकल्प ज्या राज्यात निवडणुका आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे.

प्रश्न - करोना सारख्या महामारी मध्ये जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने फार मोठे नुकसान झालेले आहे. त्याबाबत आरोग्या विषयी या अर्थसंकल्पामध्ये विशेष लक्ष दिलं जाईल असं वाटतं का?

उत्तर - या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यावर जास्त फोकस असेल. मागच्या वर्षीही आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व देण्यात आलं होतं. परंतु या वर्षी सुद्धा आरोग्य सेवेवर विशेष लक्ष दिले जाऊन त्याचबरोबर या क्षेत्रासाठी अधिकचा निधी वाढवून दिला जाईल.

प्रश्न - अर्थसंकल्प म्हटला की सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष जाते ते म्हणजे कर सवलत. हा महत्त्वाचा विषय असतो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अडीच लाखाची कर मर्यादा वाढवली जाऊ शकते का?

उत्तर - कर सवलतीबाबत दर वर्षी अर्थसंकल्प मध्ये सर्वांनाच अपेक्षा असते. काही ना काही तरी अर्थसंकल्पामध्ये कर सवलत भेटेल असं सर्वांना वाटत असते. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गाला खूश केले जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परंतु कर सवलत देताना आर्थिक डोलारा सुद्धा व्यवस्थित राहणे गरजेचं असतं. पाच लाखापर्यंत कर सवलत देण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

प्रश्न - फिक्स डिपॉझिट (एफडी) वर पाच वर्षापर्यंत सूट दिली जाऊ शकते का?

उत्तर - महत्त्वाचं म्हणजे फिक्स डिपॉझिट वर त्या पद्धतीने सूट दिली तर फार बरं होईल. जी आता पाच वर्षापर्यंत सरसकट करमाफी दिली जाते ते जर तीन वर्षापर्यंत दिली तर फार छान आहे. वास्तविक वाढ आणि मागणी हे बघताना वित्तीय तूट सुद्धा कशापद्धतीने भरून निघेल हे सुद्धा बघणे गरजेचे असणार आहे.

प्रश्न - भारत हा कृषिप्रधान देश आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसलेला आहे ते बघता कृषी साठी काही विशेष सवलत दिली जाऊ शकते का?

उत्तर - शेतकर्‍यांना पुन्हा सक्षम करण्यासाठी सरकार त्यांना द्यायचं ते अनुदान नक्कीच देईल असं वाटतं. ज्या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये बरीच राज्य विशेषता शेतीप्रधान असल्याकारणाने त्यांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा या अर्थसंकल्पात दिल्या जाऊ शकतात.

प्रश्न - रेल्वे संदर्भामध्ये विशेष करून जनतेच्या फार मोठ्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर - रेल्वे संदर्भात सांगायचं झालं तर लॉजिस्टिक वर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जाईल. सध्या कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्टेशन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्या कारणाने वस्तूची बाजारातील किंमत फार मोठ्या प्रमाणात होते. फ्रेट कॉरिडॉर वर जास्त भर दिला जाईल. नक्कीच रेल्वेच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक विचार करेल.

प्रश्न - करोना मध्ये छोटे छोटे उद्योगधंदे ठप्प झाले. बेरोजगारी वाढली. या उद्योगधंद्यांना पुनर्जिवित करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल का?

उत्तर - याबाबत सरकार नक्कीच पाऊल उचलेल. सरकारने मागील दोन वर्षांमध्ये या क्षेत्रासाठी दिलेलं आहे परंतु पुरेसं नाही आहे. सुष्म व लघु उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये याचा फटका बसलेला आहे. त्या कारणासाठी या उद्योगाला पुन्हा भरारी देण्याची मागणी होत आहे व त्या पद्धतीने सरकार नक्कीच प्रयत्न करेल.

प्रश्न - मागच्या वर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे उसळी दिसून आली, यंदा काय अपेक्षा आहे?

उत्तर - हे सर्व फील गुड फॅक्टर वर अवलंबून आहे हा चढ-उतार शेअर बाजारात होत असतो. अर्थसंकल्प जर सकारात्मक असेल तर शेअर मार्केटमध्ये सनसेक्स व निफ्टी मध्ये उच्चांक नक्कीच बघायला भेटेल.

प्रश्न - फील गूड फॅक्टर चा उल्लेख तुम्ही केला मागच्या बजेटमध्ये सुद्धा अशी अपेक्षा होती?

उत्तर - सरकारकडे काही जादूची छडी नाही आहे. त्यांना जसे जमेल तसे ते करणार. बजेट पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. परंतु त्याचबरोबर वाढ व मागणी याचा समतोल त्यांना साधायचा आहे. तरी मागच्या करोना महामारीत सुद्धा इतर देशांच्या तुलनेत आपण छान परफॉर्मन्स केलेला आहे.

प्रश्न - वरिष्ठ नागरिकांसाठी काही विशेष सवलती या अर्थसंकल्पामध्ये दिल्या जाऊ शकतात का?

उत्तर - त्या दिल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. मागच्या वर्षी पीपीएफ ला कर सवलत दिली गेली होती. काहीतरी नवीन वरिष्ठ नागरिकांसाठी द्यावं अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यांच्यासाठी नवीन पॉलिसी तरी काढायला हवीम कारण रिटायरमेंट नंतर वीस ते तीस वर्ष त्यांना त्या व्याजाच्या रूपातच पैसे भेटत असतात त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.

प्रश्न - एकंदरीत समतोल असणारा अर्थसंकल्प असेल असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर - नक्कीच सध्याची देशातील परिस्थिती बघता यंदा सर्वांना त्यांना खुश करता सुद्धा येणार नाही व सर्वांना दुःखी हि करता येणार नाही. त्या अनुषंगाने दोन्ही बाजू बघून मागणी व वाढ या पाहूनच हा अर्थसंकल्प सादर केला जाईल.

Last Updated : Jan 29, 2022, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.