ETV Bharat / city

Boy Kill Mother : अभियंता मुलाने आईचा खून करुन केली आत्महत्या - जन्मदात्या आईचा खून

अभियंता असलेल्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या ( Boy Kill Mother ) केली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात ( Sahakar Nagar Police ) मुलाच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला ( Pune Crime ) आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 2, 2022, 4:47 PM IST

पुणे - अभियंता असलेल्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या ( Boy Kill Mother ) केली. निर्मला मनेहर फरताडे ( वय 76 वर्षे), गणेश मनोहर फरताडे ( वय 42 वर्षे, दोघे रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी ), असे आई-मुलाचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

याबाबत पोलिसांकडून मिलालेली अधिक माहिती अशी की, गणेश फरताडे हा अभियंता होता. मात्र, तो बेरोजगार होता. आई सतत आजारी असल्यामुळे औषधासाठी तसेच इतर कारणांसाठी त्याने अनेकांकडून कर्ज काढले होते. औषधासाठी लागणारे पैसे, बेरोजगारी व कर्जबारीपणाला तो कंटाळला होता. त्यामुळे त्याने आई निर्मला यांना औषधांचा ओव्हर डोस दिला. त्यानंतर ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लास्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिचा खून केला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. तेथील लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी ( Sahakar Nagar Police ) घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गणेशची मावस बहीण शोनित सावंत ( वय 35 वर्षे, रा. थोरात कॉलनी, एरंडवणे ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला ( Pune Crime ) आहे. या प्रकरणचा पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा - Ajit Pawar On Narayan Rane : अजित पवारांचा नारायण राणेंना टोला; म्हणाले, "उणीधुणी काढत बसण्यापेक्षा..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.