ETV Bharat / city

'वॉन्टेड' गुन्हेगाराचा उत्तर प्रदेशात एन्काऊंटर; पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिसांना होता शोध

पिंपरी-चिंचवड शहरातील पुणेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. त्यात 90 लाख रुपयांचे 3 किलो सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. त्या दरोड्यातील मुख्य आरोपीचा पोलिसांनी बऱ्याच दिवसापासून शोध होता. अखेर उत्तर प्रदेशातील पोलिसांनी एका चकमकीमध्ये त्याचा एन्काऊंटर केला आहे.

आरोपी रवींद्र गोस्वामी
author img

By

Published : Jul 16, 2019, 9:40 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील राहटणी येथे सराफी पेढीच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आला होता. या सराईत गुन्हेगाराचा उत्तर प्रदेशातील पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे.

रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी (वय-२८ रा.आदमपूर हिस्सार) असे एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी गुन्हेगाराने साथीदारांसह पिंपरी चिंचवडमधील राहाटणी येथे दरोडा टाकला होता. त्यात तब्बल ९० लाख रुपयांचे ३ किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते. दरोडा टाकणाऱ्या पैकी तो मुख्य सूत्रधार होता. त्यामुळे वाकड पोलीस त्याच्या शोधात होते.

Accuse ravindra goswami
आरोपी रवींद्र गोस्वामी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात बंदूकधारी सहा जणांच्या टोळक्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा टाकला होता. यात मालक दिव्यांक मेहता यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यात जखमी देखील झाले होते. त्यानंतर दुकानातील तीन किलो सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही डिव्हीआर घेऊन पोबारा केला होता.

घटनेनंतर वाकड पोलीस परराज्यात जाऊन आरोपीचा शोध घेत होते. परंतु पोलिसांना तो गवसला नाही. मात्र, मंगळवारी हा 'वॉन्टेड' रवींद्र गोस्वामीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला. हा एन्काऊंटर मेरठ येथील दौराला येथील सरधान रोडवर पोलीस चकमकीत करण्यात आला असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली.

Intro:mh_pun_03_encounter_av_10002Body:mh_pun_03_encounter_av_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड शहरातील राहटणी येथे सराफी पेढीच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा उत्तर प्रदेश येथे स्थानिक पोलिसांनी एन्काऊंट केल्याचे समोर आले आहे. सराईत आरोपी गुन्हेगाराने साथीदारांसह पिंपरी चिंचवडमधील राहाटणी येथे दरोडा टाकून तब्बल ९० लाख रुपयांचे ३ किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते. दरोडा टाकणाऱ्या पैकी तो मुख्य सूत्रधार होता. रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी वय-२८ रा.आदमपूर हिस्सार अस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे, तो वाकड पोलिसांना पाहिजे होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात बंदूकधारी सहा जणांच्या टोळक्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा टाकला होता. यात मालक दिव्यांक मेहता यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, त्यात जखमी देखील झाले होते. त्यानंतर दुकानातील तीन किलो सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही डिव्हीआर घेऊन पोबारा केला होता. घटनेनंतर वाकड पोलीस परराज्यात जाऊन आरोपीचा शोध घेत होते. परंतु, त्यांच्या हाती निराशाच येत होती.मात्र, आज पाहिजे असलेला मुख्य आरोपी रवींद्र चा उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठ येथील दौराला येथे सरधान रोडवर पोलीस चकमकीत एन्काऊंटर केला आला आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.