ETV Bharat / city

Edible Oil Price Hike : युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम : खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या - सुर्यफूल तेलाची आयात

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) आहे. तर गेल्या एक ते दिड महिन्यांपासून तिथे युद्धजन्य परिस्थितीती होती. या युद्धाचा परिणाम आता भारतावरही होऊ लागला. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुर्यफूल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. युक्रेनमधून वर्षाला 30 लाख टन सूर्यफूल तेल हे भारतात आयात केले जाते. सुर्यफूल तेलाची आयात ही रशिया आणि युक्रेनमधून होत असल्याने यात 80 टक्के युक्रेनमधून तर 20 टक्के रशियामधून सूर्यफूल तेल भारतात आयात केला जातो. पण, सध्या तिथे युद्ध सुरू असल्याने तेलाची आयात बंद झाल्याने तेलाच्या किंमतीत एका डब्यामागे तब्बल 300 ते 400 रुपये एवढी वाढ झाली ( Edible Oil Price Hike ) आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 3, 2022, 10:09 PM IST

Updated : Mar 3, 2022, 10:59 PM IST

पुणे - युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) आहे. तर गेल्या एक ते दिड महिन्यांपासून तिथे युद्धजन्य परिस्थितीती होती. या युद्धाचा परिणाम आता भारतावरही होऊ लागला. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुर्यफूल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. युक्रेनमधून वर्षाला 30 लाख टन सूर्यफूल तेल हे भारतात आयात केले जाते. सुर्यफूल तेलाची आयात ही रशिया आणि युक्रेनमधून होत असल्याने यात 80 टक्के युक्रेनमधून तर 20 टक्के रशियामधून सूर्यफूल तेल भारतात आयात केला जातो. पण, सध्या तिथे युद्ध सुरू असल्याने तेलाची आयात बंद झाल्याने तेलाच्या किंमतीत एका डब्यामागे तब्बल 300 ते 400 रुपये एवढी वाढ झाली ( Edible Oil Price Hike ) आहे.

खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या

युद्ध थांबलं तरी भाववाढ ही दोन ते तीन महिने असेल - रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थितीती होती. त्यामुळे तेथून गेल्या एक ते दीड महिन्यांपासून कोणताही माल हा आयात झालेला नाही. ही मोठी गॅप पडणार आहे. जर आज तेथे शांतता जरी झाली असली तरी युक्रेनमध्ये जो मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हे सर्व काही पूर्ववत होण्यासाठी जवळपास दोन ते तीन महिने लागतील आणि अशीच खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होईल, असे देखील यावेळी व्यापारी कन्हैयालाल गुजराथी म्हणाले.

कोणकोणत्या देशातून किती आयात होते - खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या दिड महिन्यांपासून सतत वाढ होत आहे. आपल्याकडे खाद्यतेलाची खपत ही 230 ते 240 लाख टनाची आहे. त्यातील आपल्याकडे उत्पन्न हे 70 ते 80 लाख टन आहे. आपण 150 लाख टन हे एम्पोर्ट करतो. यात प्रामुख्याने मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन आणि रशिया या देशातून आपल्या देशात खाद्यतेल आयात केले जाते. ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमधून आपल्या देशात सोयाबीनची आयात करण्यात येते. इंडोनेशिया आणि मलेशिया येथून पाम तेलाची आयात केली जाते. सुर्यफुलाची आयात ही रशिया आणि युक्रेनमधून होते. त्यात युक्रेन हा जगातील एकमेव देश असा आहे जो जगात 70 टक्के तेलाचे पुरवठा करतो, अशी माहिती व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी यावेळी दिली.

इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेतून तेलाची आयात - भारतात ज्या देशांमधून तेल आयात केला जातो. तेथील काही देशांमध्ये हवामान बदलामुळे जो तेल कमी प्रमाणात आयात झाला आहे. त्यामुळे तेलाच्या इतिहासातून प्रथमच अमेरिकेतून सोयाबीन आयात केला जात आहे. हे इतिहासात कधीच अस झालं नव्हते, असेही यावेळी कन्हैयालाल गुजराथी यांनी यावेळी सांगितले.

हवामान बदलाचाही झाला परिणाम - भारतासह जगभरात आलेले करोनाचे संकट तसेच या मागच्या वर्षी झालेला पावसामुळे सोयाबीन, कापूस, शेंगदाण्याच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ब्राझील, अमेरिकेत या पिकांसाठी पोषक हवामान नव्हते. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. तसेच इंडोनिशिया आणि मलेशियामध्ये कमी पावसामुळे पाम तेलाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे उत्पादन घटल्याने त्याचा एकूण परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने खाद्यतेलाच्या दरात 400 ते 500 रुपयांनी वाढ झाली आहे, असेही गुजराथी यांनी सांगितले.

हेही वाचा - भारतीय विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का आहे पसंती! जाणून घ्या 'या' स्पेशल रिपोर्टमधून

Last Updated : Mar 3, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.