ETV Bharat / city

संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधिताला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या : अजित पवार - अजित पवार बातमी

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Aug 14, 2020, 5:22 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करत असताना, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

कोरोनाची भीती घालवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज…

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना' रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजना बरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच, कोरोना विषाणूची भिती घालवण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

कोरोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 'कोरोना'च्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.