ETV Bharat / city

पुण्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे अलका चौकात आंदोलन - pune corona updates

या घटनेमुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा कसा उडालाय याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतून प्रशासनाने कुठलाही धडा घेतला नसल्याचेच या घटनेतून उघड झाले आहे.

Due to non-availability of oxygen bed relatives of patient agitated at Alka Chowk in pune
पुण्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे अलका चौकात आंदोलन
author img

By

Published : Jul 22, 2020, 3:26 AM IST

पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुण्यातील आरोग्यव्यवस्था किती ढासळली याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका 34 वर्षीय तरुणाला ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी चक्क आंदोलन करण्याची वेळ आली. सकाळी 11 पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या रुग्णाने वेगवेगळी सात रुग्णालये पालथी घातली. परंतु त्याला ऑक्सीजन बेड मिळालाच नाही. यानंतर संतापलेल्या या रुग्णाच्या कुटुंबीयांनी पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या अलका चौकात या रुग्णासह आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने धावाधाव करत या रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली.

प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असलेल्या सागर कुंभार यांनी या सर्व प्रकाराविषयी माहिती देताना सांगितले की, धायरी येथील या रुग्णाला न्यूमोनिया असल्यामुळे आज सकाळी 11 वाजता कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात आणले होते. इथे त्याची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. परंतु कुटुंबीयांनी त्याला बरे वाटत नसल्यामुळे अडमिट करून घेण्याची विनंती केली. याउलट सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत ऍडमिट करून घेण्यास नकार दिला, असे सागर कुंभार यांनी सांगितले.

पुण्यात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे अलका चौकात आंदोलन

हेही वाचा - राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..

त्यानंतर रुग्णाची अवस्था गंभीर असल्यामुळे कुटुंब आणि नातेवाईकांनी आणखी वेगवेगळी सात रुग्णालय पालथी घातली परंतु तेथेही त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत ऍडमिट करून घेतले नाही. या सर्व प्रकारात रात्रीचे नऊ वाजले होते. इतकी रुग्णालये पालथी घालूनही बेड मिळत नसल्याचे पाहून रुग्णाचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रांनी डेक्कन येथील अलका चौकात आंदोलनाला सुरुवात केली.

गंभीर अवस्थेतील रुग्ण स्वतः बेड मिळवण्यासाठी आंदोलन करत असल्याचे पाहून पोलिसांची आणि प्रशासनाची भंबेरी उडाली. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर विश्रांतवाडीतील कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णासाठी बेड उपलब्ध झाला. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल उद्या येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.