ETV Bharat / city

Dr. Prakash Amte : डॉ. प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सरचे निदान; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु - प्रकाश आमटे मराठी बातमी

डॉ. प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू ( Dr Prakash Amte Diagnosed With Blood Cancer ) आहे.

Dr. Prakash Amte
Dr. Prakash Amte
author img

By

Published : Jun 13, 2022, 8:42 PM IST

पुणे - ज्येष्ठ समाज सेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या आरोग्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान ( Dr Prakash Amte Diagnosed With Blood Cancer )आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू ( Dr Prakash Amte Treatment At Deenanath Mangeshkar Hospital ) आहे.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. आमटे यांना तीव्र ताप आणि खोकल्‍याचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या विविध तपासण्या सुरू असून, पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्‍या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

फोन करु नये, कुटुंबीयांनी विनंती - प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या 10 दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी फोनच्या माध्यमातून त्यांना डिस्टर्ब करु नये, अशी विनंती कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या 2 किंवा 3 आठवड्यानंतर, शरीराची ताकद वाढल्यावर कर्करोगावर उपचार सुरु होतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, डॉ. प्रकाश आमटे यांना फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकाश आमटे हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचे ते पुत्र आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचलं आहे. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड समाजासाठी आणि शेजारच्या मध्य प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

हेही वाचा - Operation Santosh Jadhav : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गुजरातेतून उचलले; वाचा सविस्तर, ऑपरेशन संतोष जाधव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.