ETV Bharat / city

Dr Bhagwat Karad on Maharashtra Budget : राज्यातील सरकार घोषणा करते, पुढे काहीही करत नाही- डॉ. भागवत कराड

author img

By

Published : Mar 11, 2022, 7:11 PM IST

अर्थसंकल्पातदेखील राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलच्या करात काहीही ( Taxes on Petrol Diesel rate ) बदल केला नाही. तसेच औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातदेखील काहीही सवलत दिलेली नाही. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील अशी चर्चा सुरू आहे. पण केंद्र सरकार यावर लक्ष ( Bhagwat Karad on Fuel rate ) ठेवून आहे.

अर्थ राज्यमंत्री कराड
अर्थ राज्यमंत्री कराड

पुणे - महाविकास आघाडी सरकार घोषणा करण्यात पक्के आहे. ते घोषणा करतात. पण पुढे काहीही करत नाही, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड ( Dr Bhagwat Karad on Maharashtra Budget ) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर केली आहे. भागवत कराड हे माध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी एमसीसीआय येथे व्यापाऱ्यांची ( Dr Bhagwat Karad MCCI ) बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प आणि त्यांच्या फायदेबाबत व्यापाऱ्यांना माहिती दिली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा-UP Election Result 2022 : यूपीत सपाचे सरकार स्थापन झाले नाही म्हणून समर्थकाने घेतले विष

युक्रेनच्या स्थितीवर सरकारचे लक्ष

महाविकास आघाडी सरकारकडून शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की केंद्राने मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला. पण आजही आणि आजच्या अर्थसंकल्पातदेखील राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलच्या करात काहीही ( Taxes on Petrol Diesel rate ) बदल केला नाही. तसेच औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातदेखील काहीही सवलत दिलेली नाही. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील अशी चर्चा सुरू आहे. पण केंद्र सरकार यावर लक्ष ( Bhagwat Karad on Fuel rate ) ठेवून आहे. भविष्यात जनतेला त्रास होणार नाही, यावर सरकार उपाय करेल, असेदेखील यावेळी कराड म्हणाले.

हेही वाचा-OBC Reservation Amendment Bill : ओबीसी राजकीय आरक्षण सुधारणा विधेयकावर राज्यपालांची सही

महाविकास आघाडी सरकार लवकर गेले पाहिजे
देशातील पाच राज्याच्या निवडणुकांपैकी 4 राज्यात भारतीय जनता पक्षाचा चांगला निकाल लागला आहे. याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल, हे आत्ता तरी सांगता येणार नाही. पण जनतेच्या मनात भारतीय जनता पक्ष हे चांगल्यापद्धतीने बसली आहे. राज्याचा विकास जर करायचा असेल तर महाविकास आघाडी सरकार लवकर गेले पाहिजे. तरच राज्याचा विकास होईल, असा दावा कराड यांनी केला.

1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज राज्याचा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पुर्वी त्यांनी महाराष्ट्र हे 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य असेल असे स्पष्ट केले होते. 24 हजार 353 कोटीची महसुली तूट असलेला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. 4 लाख 3 हजार 427 कोटी महसुली जमा तर 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित महसुली खर्च असल्याचे तसेच 2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात 24 हजार 353 कोटी महसुली तूट येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंचसूत्रीवर यंदाचा अर्थसंकल्प

कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राची ३००० कोटी रुपयांची थकबाकी दिली. मात्र, अद्याप २६ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी कायम असल्याची माहितीही दिली. पुण्याजवळील हवेली येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटींची तरतुद केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.