ETV Bharat / city

पालिकांमधील चतुर्थ श्रेणी कामगारांमध्ये भेदभाव नको, सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या : प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : May 2, 2020, 6:35 PM IST

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये महानगरपालिका, नगरपालिकांधील चतुर्थ श्रेणी कामगारांचे खुपच हाल होत आहेत. त्यातही कायमस्वरुपी कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्यात प्रोत्साहनपर भत्ता वाटपात भेदभाव होत आहे, असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

पुणे - महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच कंत्राटी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. कामगारांमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये. याबाबत शासनाने तात्काळ उपाययोजना करुन अंमलबजावणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा.... ..तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखण्यात येईल, खासदार शेवाळेंचा इशारा

मुंबईसह देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रेड झोनमध्ये आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. असे असले तरिही मुंबई मनपाचे आपत्कालीन कर्मचारी जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. हे कर्मचारी नागरिकांना २४ तास पाणी, वीज मिळावी यासाठी कर्तव्यावर आहे. तर शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून चतुर्थ श्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहे.

पालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात प्रोत्साहन भत्ता दिला जातो आहे. त्यासाठी संघटना आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केली आहे. तरीही कायमस्वरूपी कामगार सोडल्यास कंत्राटी आणि स्वयंसेवी संस्थेच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता दिला जात नाही. त्यांच्यात भेदभाव केला जातोय, अशा अनेक कामगारांच्या तक्रारी आलेल्या आहेत. सर्वांचे काम समान असूनही समान वेतन नाही, प्रोत्साहन भत्ता नाही. हा त्यांच्यावर अन्याय असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा भेदभाव दूर करावा. कोरोना काळात या कामगारांना नियमित प्रोत्साहन भत्ता त्यांना देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.