पुणे - पुण्यात आबा बागुल मित्र परिवाराच्यावतीने दरवर्षी सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या बालगोपाळांसोबत दिवाळी साजरी केली जाते. हे या अनोख्या उपक्रमाचे 9 वे वर्ष आहे. यंदा शहरातील शंकरशेट रोडवर वस्तू विकणाऱ्या बालकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त या बालकांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
आपल्या प्रमाणाचे या मुलांची दिवाळी देखील आनंदात जावी, काही काळ का होत नाहीत पण सुखाचे क्षण त्यांच्या वाट्याला यावेत. या हेतून मुलांसोबत ही दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीनिमित्त या मुलांना औक्षण करून अभ्यंगस्नान घातले जाते. त्यानंतर या मुलांना कपडे, विविध भेटवस्तू व फराळाचे वाटप होते. मात्र यंदा कोरोनामुळे या मुलांना अभ्यंगस्नान न घालता, दिवाळी साहित्य आणि त्यांच्या कुटुंबाला किराणा किट देऊन ही दिवाळी साजरी करण्यात आली. अशी माहिती पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी दिली. दरम्यान आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. त्यांची जयंती सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केली जाते. आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने हा बालदिन विशेष मुलांसोबत साजरा करण्यात आला.
हेही वाचा - दिवाळीचा फराळ चालला सात समुद्रापार; पोस्टाची 82 देशांमध्ये सेवा
हेही वाचा - 'दादा' नवी टू व्हिलर घेतलीये, पूजा कराल काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वळवला मोर्चा...