ETV Bharat / city

पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा एकदा वाद; हॉटेल मालक आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी - Dispute over biryani

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बिर्याणीवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलावर संपूर्ण राज्यातून टीका झाली. बिर्याणीचा तो वाद संपतो न संपतो तोच आणखी एका बिर्याणी प्रकरणावरून वाद झाला आहे. हॉटेल मालक आणि ग्राहकांत झालेल्या या वादातून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत.

Dispute over biryani once again in Pune
पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा एकदा वाद; हॉटेल मालक आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी
author img

By

Published : Aug 23, 2021, 4:18 PM IST

पुणे - बिर्याणीच्या बिलावरून पुण्यात हॉटेल मालक आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. बिर्याणी खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी बिलाच्या वादावरून आपल्या साथीदारांना बोलावून हॉटेल मालकसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली आहे. याप्रकरणी मयुर मते (वय 33) यांच्या तक्रारीवरून सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालकावर धारदार शस्त्राने केले वार -

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयुर मते यांचे धायरी परिसरात गारवा बिर्याणी हॉटेल आहे. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन ग्राहक त्यांच्याकडे बिर्याणी खाण्यासाठी आले होते. मयुर मते आणि या ग्राहकांमध्ये बिलावरून वाद झाला आणि याच वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. त्यानंतर या दोघांनी आणखी काही साथीदारांना बोलावून मयुर मते यांच्या हॉटेलात प्रवेश केला आणि मयुर मते यांच्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमधील कामगार मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असताना यामध्ये तो जखमी झाला आहे.

गुन्हा दाखल -

हॉटेलमध्ये घुसलेल्या या टोळक्याने तक्रारदार मते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लोखंडी रॉडने देखील वार केले. तर हॉटेलमधील बिर्याणीचे पातेले, झाकण आणि इतर साहित्य फेकून दिले. या सर्व प्रकाराने धायरी परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

यापूर्वीही बिर्याणीवरून झाला होता वाद -

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बिर्याणीवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर पुणे पोलीस दलावर संपूर्ण राज्यातून टीका झाली. बिर्याणीचा तो वाद संपतो न संपतो तोच आणखी एका बिर्याणी प्रकरणावरून वाद झाला आहे. हॉटेल मालक आणि ग्राहकांत झालेल्या या वादातून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत.

हेही वाचा - 'केंद्र सरकार आम्हाला मुनीम बनवू पाहत आहे'; 'एचयुआय'डी प्रक्रियेविरोधात सराफ व्यावसायिक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.