पुणे - जिल्हा बँक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे ( PDCC Bank President Digamber Durgade ) यांची निवड करण्यात आली आहे. तर सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी ( PDCC Bank Vice-President Sunil Chandore ) निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ( DYCm Ajit Pawar ) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ( NCP Leader Ajit Pawar ) यांनी केली.
संचालक मंडळात राष्ट्रवादीचे वर्चस्व -
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची पहिली बैठक बोलवण्यात आली होती. बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, यावेळी अध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागांवर बिनविरोध निवड झाली होतो. तर उर्वरित 7 जागांसाठी निवडणूक झाली होती. यानंतर आज होणाऱ्या बैठकीत अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. बँकेच्या 21 संचालकांची निवडणूक नुकतीच झाली. काही जण बिनविरोध नविडून आले तर काहींनी दिग्गजांना पराभूत केले. यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरले.