ETV Bharat / city

खासगी सहभागातून पुण्यातील ऐतिहासिक स्थळांचा विकास, यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद - पुण्यातील ऐतिहासिक स्थळांचा विकास

पुणेकरांच्या आपुलकीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंचा पुनर्विकास खासगी सहभागातून केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुण्याची ओळख असलेली ठिकाणे आता खासगी विकासकांच्या हवाली केली जाणार असल्याने या स्थळांचे जतन होणार की, खासगीकरण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Mar 3, 2021, 9:24 PM IST

पुणे - केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत पुणे महापालिकेनेही खासगी गुंतवणुकीची दारे उघडली आहेत. त्यातही पुणेकरांच्या आपुलकीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंचा पुनर्विकास खासगी सहभागातून केला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पुण्याची ओळख असलेली ठिकाणे आता खासगी विकासकांच्या हवाली केली जाणार असल्याने या स्थळांचे जतन होणार की, खासगीकरण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे
पुणे दर्शनासाठी शहरात येणाऱ्या पर्यटकांनी तुळशीबाग, महात्मा फुले मंडई यांना भेट दिली नाही, असे होतच नाही. शिवाय शहरात राहणारे नागरिकही खरेदीसाठी किंवा अन्य कामांसाठी या परिसरात येतच असतात. त्यामुळे ऐतिहासिक पुण्याची ओळख म्हणजे महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग आहे. यांचा खासगी तत्वावर विकास करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपकडून करण्यात आले आहे. यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात योजना आखण्यात आली आहे.
सारसबाग आणि पं. नेहरू स्टेडियम परिसराचा एकत्रित पुनर्विकास
गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे महापालिकेच्या सारसबाग आणि पेशवे पार्क या मिळकतींचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ही प्रक्रिया सुरू असून, आता या मिळकतींसह स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बालभवन, गणेश कला क्रीडा संकुल आणि परिसर (प्लॉट 41, 42 आणि 43 ए) या मिळकतींचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर पुनर्विकास करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
महात्मा फुले मंडई
उत्तम वास्तुस्थापत्याचा नमुना असणार्‍या महात्मा फुले मंडईचा काही वर्षांपुर्वीच पुर्नरविकास करण्यात आला होता. आता महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये खासगी सहभागातून मंडईचा पुर्नरविकास करण्यात येणार आहे. या भागातून भुयारी मेट्रो जाणार असून, मेट्रो स्टेशन विकसित होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. या ठिकाणी भाजी मंडईची क्षमता वाढविणे, व्यावसायिक गाळ्यांची संख्या वाढविणे, पार्किंगची सुविधा उपलब्ध करूनदेणे अशा पद्धतीने पुनर्विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तुळशीबागेचा पुनर्विकास
श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आणि गणपती, शंकर, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि दत्तात्रेयांच्या मंदिरांसाठी पेशवेकालीन तुळशीबाग प्रसिद्ध आहे. कॉस्मॅटिक, ज्वेलरी आणि नित्य गृहोपयोगी वस्तू मिळण्याचे हक्काचे ठिकाण अशी तुळशीबागेची ओळख आहे. महिला आणि युवतींना तुळशीबागेचे विशेष आकर्षण आहे. अशा ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या तुळशीबाग आणि परिसराचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकसन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालयाचा पुनर्विकास
शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावर पुणे महापालिकेचे ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालय’ आणि महापालिकेची कोठी असा परिसर आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मिळकतीचे बाजारमूल्य अधिक आहे. या मिळकतींची देखभाल-दुरूस्ती करण्यात दरवर्षी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या मिळकतीभोवती महापौर निवास, राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अशा वास्तू आहेत. मुद्रणालय आणि कोठी या मिळकती पूर्ण क्षमतेपर्यंत विकसित होण्यासाठी आणि त्यापासून पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याकरिता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकसन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.