ETV Bharat / city

वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून 'ते' ट्विट डिलीट केलं - अजित पवार - ajit pawar twitt delete

जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट केले होते. त्यानंतर ते लगेच डिलीट करण्यात आले होते.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Sep 25, 2020, 7:22 PM IST

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या ट्विटरवरून एक मेसेज ट्विट केला होता. त्यानंतर काही वेळाने ते ट्विट डिलीट करण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून ते ट्विट डिलीट केले, असे उत्तर अजित पवार यांनी आज पुण्यात दिले. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारे ते ट्विट होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार

भाजपाला शह देऊन सत्ता स्थापन केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे, विरोधी पक्षाच्या मातृसस्थेच्या उभारणीत महत्त्वाचे नेते असलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीला आठवणीने ट्विट करून त्यांचे स्मरण करतात, ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. त्यानंतर काही वेळाने हे ट्विट डिलीट केले होते. त्यामुळे या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

हेही वाचा - 'ते' ट्विट डिलीट करण्यासाठी अजित पवारांवर महाविकास आघाडीचा दबाव : आशिष शेलार

याबाबत पुण्यात आलेल्या अजित पवारांना प्रश्न विचारला असता, समाजकारण राजकारण करत असताना काही गोष्टी होत असतात. त्यात वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून ते ट्विट डिलीट केले, असे उत्तर अजित पवार यांनी दिले. मात्र, नेता कुठलाही असो त्यांच्या जयंतीला त्यांचे स्मरण केले ही आपली संस्कृती आहे, असेही अजित पवार म्हणाले.

राज्यात कोरोना, शेतकरी या प्राथमिक गरजा असून, याकडे लक्ष दिले पाहिजे, पण आपण भलत्याच मुद्द्यांवर लक्ष देतो, असे अजित पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.