ETV Bharat / city

पुण्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट, मंगळवारी 2879 रुग्णांना बाधा - Total positive patients in pune

मंगळवारी शहरात दिवसभरात २८७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात ३६७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सोमवारी (३ मे) देखील दिवसभरात २५७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती.

पुण्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट,

author img

By

Published : May 5, 2021, 7:55 AM IST

पुणे - शहर व जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले होते. वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येने प्रशासन चिंतीत झाले होते. मात्र मागील 2 दिवसांपासून वाढत्या कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

४ मे रोजी मंगळवारी शहरात दिवसभरात २८७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात ३६७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सोमवारी (३ मे) देखील दिवसभरात २५७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती. तर दिवसभरात ४०४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तसेच सोमवारी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यातले १८ रुग्ण पुण्याबाहेरील होते.

शहरात आतापर्यंत एकूण ७०५४ मृत्यू

दरम्यान मंगळवारी ४ मे रोजी पुण्यात ८२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यातले १९ रुग्ण पुण्याबाहेरील होते. तसेच सध्या शहरात १४१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४ लाख ३३हजार०८९ इतकी झाली असून सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३९हजार८३९ आहे. शहरात आतापर्यंत एकूण ७०५४ मृत्यू झाले आहेत. आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३ लाख ८६ हजार १९६ आहेत, मंगळवारी शहरात १५०९८ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.