पुणे - राज्यातील महाविद्यालय 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबतचा निर्णय बंधनकारक नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांचे वर्ग भरवायचे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्या त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय विद्यापीठ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या विविध समस्या घेऊन मंत्र्यांसमोर उपस्थित झाले होते. सकाळी 11 ते 5 या वेळेत या तीनही जिल्ह्यातून आलेल्या जवळपास चार हजार तक्रारींचा निपटारा मंत्र्यांनी या माध्यमातून केला.
हेही वाचा - टिव टिव करणारे अभिनेते गेले कुठे? राज्यात त्यांचे शूटिंग बंद पाडू- नाना पटोले
शिक्षक भरती अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या, शिष्यवृत्तीची सवलत असे विविध प्रलंबित प्रश्न मंत्र्यांनी ऐकले आणि ते सोडवण्याचे आदेश दिले आहेत. आजच्या या मेळाव्यात वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेले 86% प्रश्न मार्गी लागल्याचा दावा उदय सामंत यांनी केला असून, हे काम केल्याने एक समाधान असल्याचं सामंत यावेळी म्हणाले.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू