पुणे - डायलिसिसच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका तरुणाचा अचानक त्रास झाल्यामुळे पुणे अहमदनगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या तरुणाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत तरुणाच्या भावाने केली. प्रदीप सखाराम खांदवे (वय 37) असे मृत रुग्णाचे नाव आहे.
'डायलिसिसकरता आलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा' - पुणे ससून रुग्णालय बातमी
खांदवे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी दुसऱ्या खासगी डॉक्टर मार्फत रुग्णाची तपासणी करून देण्याची मागणी केली. परंतु सह्याद्री रुग्णालयाने याला नकार दिला. परंतु कुटुंबीयांनी ही मागणी लावून धरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना ही परवानगी देण्यात आली. प्रायव्हेट डॉक्टर रुग्णांची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना प्रदीप खांदवे हे मृत असल्याचे समजले. त्यानंतर प्रदीप खांदवे यांच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालय आणि ससून रुग्णालयात covid-19 ची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.