पुणे - शहरात शनिवारी दिवसभरात 6006 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 5609 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 75 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातले 21 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.
सध्या शहरात सक्रिय रुग्णांपैकी 1 हजार 236 रुग्ण क्रिटिकल आहेत. आजपर्यत पुण्यात नोंद झालेल्या एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 लाख 60 हजार 803 इतकी आहे. सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 54 हजार 967 इतकी आहे. तर आजपर्यंत एकूण मृत्यू 6056 झाले आहेत. आजपर्यंतच एकूण 2 लाख 99 हजार 780 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 24 हजार 506 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील परिस्थिती -
पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या 1 लाख झाली आहे. आज दिवसभरात तब्बल 12 हजार 836 रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 100 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.