ETV Bharat / city

रोजगार नसल्याने परप्रांतीय मजुरांची घराकडे धाव, रेल्वेस्थानकावर गर्दी

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंध लावण्यात आल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच राज्यात लॉकडाऊन लागण्याची भीती असल्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी घरचा रस्ता धरला आहे. गावी जाण्यासाठी मजूर रेल्वेस्थनकांवर गर्दी करत आहेत.

पुण्यात रेल्वेस्थानकावर मजुरांची गर्दी
पुण्यात रेल्वेस्थानकावर मजुरांची गर्दी
author img

By

Published : Apr 13, 2021, 9:32 PM IST

पुणे - पुण्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या शिवाय जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे पुण्यात आता लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रोजगार हिरावला गेल्यामुळे परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाची वाट धरल्याचे चित्र दिसत आहे.

पुण्यात रेल्वेस्थानकावर मजुरांची गर्दी

रेल्वे स्थानकावर गर्दी

पुणे रेल्वे स्थानकावर गावी जाण्यासाठी मजुरांची मोठी गर्दी उसळली आहे. पुण्यात हॉटेल व्यावसायिकांना फक्त डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी कामगारांना घरी जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी पुन्हा एकदा गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर धाव घेतली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी उसळल्याची पाहायला मिळाली. या संपूर्ण घटनेचा रेल्वे स्थानकावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी.

हेही वाचा - आज लॉकडाऊनच्या निर्णयाची शक्यता - अस्लम शेख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.