पुणे - मुख्य शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये साथीचेरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू करण्यात आल्याने जमावबंदी आहे. यामुळे सर्व शहरातील गर्दीत लक्षणीय घट झाली आहे.
तसेच विविध संस्था, व्यापारी संकुल, मॉल, सिनेमागृह व जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत. पुण्यातील व्यापारी महासंघाने देखील पुढील तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. एकंदरीतच धार्मिक स्थळ, व्यापार बंद असल्याने शहरात वर्दळ कमी झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना बाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. याचा परिणाम शहरात दिसत आहे.