ETV Bharat / city

सिंहगड रस्त्यावर टोळक्याची दहशत, अनेक वाहनांची केली तोडफोड

सिंहगड परिसरात असलेल्या तुकाई नगरमध्ये कोयते धारी टोळक्याने दहशत माजवत दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली.

author img

By

Published : Aug 21, 2019, 12:08 PM IST

Updated : Aug 21, 2019, 12:37 PM IST

कोयते धारी टोळक्याने दहशत माजवत दहा ते बारा या वाहनांची तोडफोड केली

पुणे- सिंहगड परिसरात असलेल्या तुकाई नगरमध्ये कोयते धारी टोळक्याने दहशत माजवत दहा ते बारा या वाहनांची तोडफोड करत नागरिकांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील तुकाई नगर भागात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

कोयते धारी टोळक्याने दहशत माजवत दहा ते बारा या वाहनांची तोडफोड केली

या भागातील एक तडीपार गुंड जामिनावर बाहेर आला होता. या तडीपार गुंडाचा काही तरुणांशी वाद होता आणि या टोळक्याने तुकाईनगरमध्ये येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हातात कोयते घेऊन हे टोळके रस्त्यावर दहशत माजवत होते. या टोळक्याने रस्त्यावर दिसेल त्या वाहनाची तोडफोड केली. तसेच काही नागरिकांनादेखील मारहाण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तोडफोड करून हे टोळके पसार झाले. हे सगळे तरुण हडपसर भागातील असल्याचे समोर आले असून यासंदर्भात सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:सिंहगड रस्त्यावर टोळक्याची त्याची दहशत अनेक वाहनांची केली तोडफोडBody:mh_pun_01_sinhagad_road_todfod_av_7201348

Anchor
पुण्यातील सिंहगड परिसरात असलेल्या तुकाई नगर मध्ये होते कोयते धारी टोळक्याने दहशत माजवत दहा ते बारा या वाहनांची तोडफोड करत नागरिकांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे पुण्यातील तुकाई नगर भागात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे या भागातील एक तडीपार गुंड जामिनावर बाहेर आला होता या तडीपार गुंडा चा काही तरुणांशी वाद होता आणि या टोळक्‍याने तुकाई नगर मध्ये येऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला हातात कोयते शस्त्र घेऊन हे टोळके रस्त्यावर दहशत माजवत होते रस्त्यावर दिसेल त्या वाहनां ची तोडफोड या टोळक्याने केली तसेच काही नागरिकांना देखील मारहाण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांमध्ये घबराट पसरली होती दरम्यान दहशत मधून हे टोळके पसार झाले हे सगळे तरुण हडपसर भागातील असल्याचं समोर आले असून यासंदर्भात सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेConclusion:
Last Updated : Aug 21, 2019, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.