ETV Bharat / health-and-lifestyle

दीर्घायुष्यासाठी वापरा जपानी फंडा; असे रहा सुदृढ - JAPANESE HEALTHY HABITS FOR LIVING

Japanese Healthy Habits For living: जपानी लोक निरोगी जीवनशैली आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी का प्रसिद्ध आहेत, तुम्हाला माहिती आहे काय? जाणून घ्या जापानी लोकांची जीवनशैली.

Japanese Healthy Habits For living
जापानी महिला (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 11, 2024, 4:27 PM IST

Japanese Healthy Habits For living: धकाधकीचं जीवन आणि अनियमित आहार पद्धतीमुळं भारतीयांचं आयुर्मान कमी होत चाललंय. कमी वयातच बहुतांश लोक मधुमेह, कोलेस्ट्रेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांना बळी पडत आहेत. परंतु, जपान हा एकमेव देश आहे, जेथील लोक निरोगी जीवनशैली आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या दिनचर्येत काही खास सवयींचा अबलंब करतात. त्यामुळे त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ चांगलं राहातं. जपानमधील लोक तणाव तसंच आजारांपासून फार दूर आहेत. तुम्हालाही जपानी लोकांसारखं निरोगी आणि दीर्घायुष्य असेल तर, खाली दिलेल्या काही टिप्स फॉलो करा. यामुळं तुम्ही शारीरिक दृष्ट्याचं नव्हे तर मानसिक दृष्ट्या देखील चांगले राहू शकता.

व्यायाम आणि चालणं: प्रत्येक जपानी व्यक्ती दररोज न चुकता व्यायाम करतो. तसंच काही तास चालतो. हे लोकं सतत काही-ना-काही शारीरिक अ‍ॅक्टीव्हीटी करत असतात. त्यामुळं ते नेहमी निरोगी जीवन जगतात. व्यायाम करणं हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तुम्हाला योगा करण्याचा कंटाळा येत असेल तर किमान 30 मिनिटं चालल्यानं देखील तुम्ही जपानी लोकांसारखं निरोगी जीवन जगू शकता.

Japanese Healthy Habits For living
जपानी तरूणी (ETV Bharat)
  • सक्रिय जीनवशैली : जपानी लोक सक्रिय जीनवशैली जगतात. शारीरिक हालचाल हा त्यांच्या रुटीनचा पार्ट असतो. जपानमधील लोक सायकलिंग आणि चालण पसंत करतात. हा जपानमधील वाहतुकीचा सामान्य प्रकार देखील आहे. तसंच जपानी लोक सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करतात. सक्रिय राहणं हा जणू त्यांच्या संस्कृतीचाच भाग आहे.
  • सात्विक आहार: जपानी लोक सीफूड, ताजे मासे, धान्य, आंबवलेले पदार्थ आणि हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खातात. तसंच हे लोक कोल्डड्रिंक पित नाही. तसंच जंग फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या ते दूर राहतात. त्यांच्या आहारात मिसो आणि नट्टोसारखे पदार्थ अवश्य असतात. ते नेहमी हेल्दी आणि घरगुती खाण्यावर भर देतात.
  • निसर्गाच्या सानिध्यात राहणं पसंत : जपानी लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. आपला बहुतांश वेळ ते निसर्गाच्या सानिध्यात घालवतात. टेक्नॉलॉजि, फोन तसंच इतर करमणूकीच्या साधनांपेक्षा ते जंगल, झाडं आणि हिरव्या रानात वेळ घालवाणं पसंत करतात. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून रिफ्रेश होतात आणि पुन्ही जोमाने आयुष्य जगतात.
  • सुरक्षेचे उपाय: तुम्हाला माहिती आहे काय सुरक्षितता आणि कमी गुन्हेगारी हे दोन जपानची वैशिष्ट्य आहेत. या कारणांमुळं जपानचा आदर केला जातो. जपानी लोकांना अपघाताची भिती नसते. हिंसेचं प्रमाण कमी असल्यामुळे येथील लोक त्यांचं आयुष्य शांत जगतात.
  • इकीगाई संक्लपनेवर भर: जपानी लोक इकीगाई संकल्पनेवर भर देतात. इकीगाईचा अर्थ जीनवाचा उद्देश शोधणे आणि त्याच्या पूर्तेतेसाठी परिश्रम करणे होय. जीवनात एखादा उद्देश सुनिश्चित केला पाहिजे. जीवन जगण्याचे काही उद्देश असल्यास तुम्ही उत्साही राहता. त्याचबरोबर निराशा दूर राहते. हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
  • लठ्ठपणापासून दूर: जगभरातील देशांच्या तुलनेत जपानी लोकांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण कमी आहे. संतुलित आहार त्याचबरोबर सक्रिय जीनवशैलीमुळं येथील लोक लठ्ठपणाचे शिकार होत नाही. जपानी लोक वजनाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. सावधान! जेवल्यानंतर लगेच झोपणं पडेल महागात
  2. तुम्ही सतत चिंताग्रस्त असता का? ट्राय करा 'या' टिप्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.