ETV Bharat / sports

भारत-बांगलादेश T20 सामना स्टेडियममध्ये बघायचा? रेल्वे दराच्या किंमतीत मिळतंय तिकीट, 'असं' खरेदी करा ऑनलाइन आणि ऑफलाइन - IND VS BAN 3RD T20I MATCH TICKETS

भारत विरुद्ध बांगलादेश 2024 मधील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

How To Buy IND vs BAN 3rd T20I Match Tickets :
How To Buy IND vs BAN 3rd T20I Match Tickets (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 11, 2024, 4:06 PM IST

हैदराबाद How To Buy IND vs BAN 3rd T20I Match Tickets : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबर (शनिवार) रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश 2024 मधील तिसऱ्या T20 सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर या बातमीत मिळेल.

हैदराबादेत होणार तिसरा सामना : भारतीय संघ विरुद्ध बांगलादेश संघ यांच्यातील मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यात यजमान संघानं पाहुण्या संघाचा पराभव केला आहे. पहिला सामना ग्वाल्हेर, दुसरा सामना दिल्लीत झाल्यानंतर आता हा काफीला हैदराबादला आला आहे, जिथं भारतीय क्रिकेट संघ 12 ऑक्टोबर रोजी बांगलादेश क्रिकेट संघाशी भिडणार आहे. या सामन्यात विजय मिळवत बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

बांगलादेशसाठी प्रतिष्ठा राखण्याचा सामना : दुसरीकडे, जर बांगलादेशला आपली प्रतिष्ठा कायम राखायची असेल आणि भारताविरुद्ध T20 दुसरा विजय मिळवायचा असेल तर त्यांना खूप मेहनत करावी लागेल. त्यांना सध्याच्या T20 विश्वचषक चॅम्पियनसमोर आव्हान उभं करायचं असेल तर सर्वच खेळाडूंना पुढं येऊन चांगली कामगिरी करावी लागेल. तरच त्यांना विजय मिळवत क्लीन स्वीप टाळता येईल.

कुठं करता येईल सामन्याचं तिकीट : भारत विरुद्ध बांगलादेश मालिका 2024 मध्ये आतापर्यंत अतिशय रोमांचक क्रिकेट ॲक्शन पाहण्यात आलं आहे. मागील सामन्याप्रमाणे, भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या T20I सामन्याची तिकिटं Insider.in वर उपलब्ध आहेत. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश T20I पाहण्यात इच्छुक असलेले चाहते वेबसाइटवर लॉग इन करु शकतात. भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या T20 सामन्यांच्या तिकिटांच्या किंमती 750 ते 15,000 रुपयांपर्यंत आहेत.

ऑफलाईन तिकीट कसं मिळेल : तथापि, बांगलादेश विरुद्ध भारत तिसऱ्या T20I साठी चाहत्यांनी जिमखाना स्टेडियममधून वैयक्तिकरित्या तिकिटे काढणं आवश्यक आहे.

हेही वाचा :

  1. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतून बाहेर पडल्यास, कोण होणार भारताचा कर्णधार?
  2. 823/7... इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उभारला धावांचा हिमालय; क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 'असं' फक्त चारवेळा झालं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.