मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या जोडप्यानं घर आणि फार्म हाऊस रिकामे केले गेले पाहिजे, असं ईडीनं आपल्या तक्रारत म्हटलं होतं. आता न्यायालयानं घर आणि फार्म हाऊस रिकामे करण्याच्या नोटीसला स्थगिती दिली आहे. शिल्पा आणि राजनं यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित त्यांचे घर-फार्म हाऊस रिकामे करण्याच्या नोटीसला न्यायालयात आव्हान दिले होते. मनी लाँड्रिंगशी संबंधित तपासात ईडीनं 27 सप्टेंबर रोजी शिल्पा आणि तिच्या पतीला नोटीस पाठवली होती.
मनी लाँडरिंग केस : यानंतर या जोडप्याला 10 दिवसांच्या आत त्यांचे पुण्यातील घर आणि फार्म हाऊस रिकामे करावे लागतील असे सांगितले गेले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं ईडीच्या नोटीसला स्थगिती दिली. आता काही काळासाठी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावरच संकट टळलं आहे. शिल्पा शेट्टीला पाठवलेल्या नोटीसवर ईडीनं गुरुवारी या जोडप्याची मालमत्ता जप्त करण्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. शिल्पा आणि राज यांचा वकील प्रशांत पाटील यांनी शेअर केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, 2017 च्या कथित पॉन्झी घोटाळ्याशी श्री कुंद्रा आणि श्रीमती शेट्टी यांचा कोणताही संबंध नसल्याचं नमूद केलं आहे.
शिल्पा आणि राज करणार अपील : आता हे जोडपे दिल्लीतील न्यायाधिकरणासमोर अपील करणार आहेत. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत शिल्पा आणि राज ईडीला सहकार्य करत राहतील, असंही निवेदनात म्हटलं गेलं आहे. ईडीकडून घर रिकामे करण्याची नोटीस मिळाल्यानंतर या दोघांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांना जुहू आणि पवना तलावातील मालमत्ता 13 ऑक्टोबरपर्यंत खाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अहवालात असंही नमूद करण्यात आलं होतं की, मुंबई विभागीय कार्यालयानं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA) 2002 अंतर्गत राज कुंद्रा यांच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- वयाच्या 69व्या वर्षी रेखानं शिल्पा शेट्टीबरोबर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल... - Super dance Rekha video
- अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राविरोधात तपास करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश, नेमकं प्रकरण काय? - Shilpa Shetty
- शिल्पा शेट्टीनं केदारनाथ धाम आणि माँ वैष्णो देवीच्या दर्शनामधील व्हिडिओ केला शेअर, पाहा पोस्ट - Shilpa Shetty