पुणे - शहर आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्ग आणि त्यावरील उपाययोजना व पुढील परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पुण्यातल्या विधानभवन येथे कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थितीत होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात ही कोरोना आढावा बैठक सुरू होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.