पुणे - राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा विविध क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनलॉकनंतर अजूनही अनेक व्यवसाय, रोजगार रुळावर आलेले नाहीत. राज्यातील लोककला जिवंत ठेवणारे कलाकार यांना देखील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा - 15 नायट्रोजन टॅंकरचे लवकरच होणार ऑक्सिजन टँकरमध्ये रुपांतर; एफडीएचा निर्णय
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लहान मोठ्या जत्रांमध्ये तमाशाच्या माध्यमातून आपली कला सादर करत ग्रामीण महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱया कलावंतांवर बिकट परिस्थिती उद्धभवली आहे. ना कुठे जत्रा ना कुठे तमाशाचा फड, मात्र रोजचे जीवन जगण्यासाठी पैसा कुठून येणार? अशा परिस्थितीत अडकलेल्या या सामान्य लोककलावंतांनी आपल्या व्यथा सरकारकडे मांडल्या आहेत. आतातरी सरकार आमच्या व्यथा समजून घेत मदत करेल, अशी अपेक्षा कलावंतांनी 'ई टीव्ही भारत'कडे बोलून दाखवली आहे.