ETV Bharat / city

आघाडीबाबत नाना पटोले म्हणाले, आम्हाला कोणाच्या मागे फरकडत जायची सवय नाही - नाना पटोले पुणे दौरा

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वबळाचा नारा देण्यात आलं. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आघाडी होणार की नाही याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली.

nana patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Feb 5, 2022, 9:56 PM IST

Updated : Feb 5, 2022, 10:15 PM IST

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वबळाचा नारा देण्यात आलं. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आघाडी होणार की नाही याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारलं असता ते म्हणाले की, बाकीच्या पक्षाने आपल्यापरीने घोषणा केली आहे. आम्हाला कोणाच्या मागे फरकडत जायची सवय नाही. काँग्रेसचा विचार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आहे आणि तो विचार लोकांपर्यंत पोहचवून त्याचा मताच्या रुपात कसा आणता येईल याचा विचार करू, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात परिवर्तन रॅली काढण्यात आली. त्यानंतर काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानंतर ते बोलत होते.

प्रभाग आपल्या सोयीने आपले उमेदवार निवडून येतील असा करण्यात आला-

प्रभाग रचना निर्माण केली जाते त्याला नैसर्गिक पद्धत आहे. त्यामागील उद्देश हाच असतो की त्या भागातील लोकांना त्याभागातील नेतृत्व मिळावे. मागील युतीच्या काळापासून एक पद्धत सुरू झाली आहे आणि ती पद्धत आताही पाहायला मिळाली आहे. प्रभाग आपल्या सोयीने आपले उमेदवार निवडून येतील असा करण्यात आला आहे. काँग्रेसची यात भूमिका ही आहे की जनतेच्या सोयीचे हे प्रभाग व्हायला पाहिजे. जनतेच्या गैरसोयीची जी प्रभाग रचना करण्यात आली आहे त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

आम्हाला रावणाचा घमंड करता येत नाही -

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष्याच्यावतीने दावे आणि निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. यावर नाना यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्हाला रावणाचा घमंड करता येत नाही. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही जनतेच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि ते मतपेटीच्या रूपाने बाहेर येतील, असं देखील यावेळी नाना म्हणाले.

आज भाजप नेते किरीट सोमैयांवर जो महापालिका आवारात हल्ला करण्यात आला आहे त्याबाबत नाना यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला याविषयी काहीच माहिती नाही. घटनेची माहिती घेऊनच सविस्तर बोलतो.

Last Updated : Feb 5, 2022, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.