ETV Bharat / city

काँग्रेस शिवाय आघाडी झाली तर, ती अप्रत्यक्षपणे मोदींना मदत - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण - ममता आघाडी पृथ्वीराज चव्हाण प्रतिक्रिया

काँग्रेसला सोडून आघाडी केली तर, ती अप्रत्यक्षपणे मोदींना मदत होईल, असे मत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan comment on cm mamta banerjee ) यांनी व्यक्त केले.

Prithviraj Chavan comment on cm mamta banerjee
ममता बॅनर्जी टीका पृथ्वीराज चव्हाण पुणे
author img

By

Published : Dec 5, 2021, 4:05 AM IST

पुणे - काँग्रेसला सोडून आघाडी केली तर, ती अप्रत्यक्षपणे मोदींना मदत होईल, असे मत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan comment on cm mamta banerjee ) यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा - Etv Bharat Special - वाचा... गावातील पहिल्या पदव्युत्तर मुलीचा संघर्ष

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्यात या सप्ताहात 70 वर्षे आणि सात वर्षे, या विषयावरील व्याख्यानमालेत पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

ममता बॅनर्जी या देशाच्या नेत्या आहेत. त्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडले. त्यांना विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे. काँग्रेस पक्षाने त्यांचे विचार स्वीकारावे असे काहीही नाही. त्यातही एक स्पष्ट आहे की, आज मोदींना सत्तेतून बाहेर करायचे असेल तर, सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. आणि एक आघाडी करायला हवी. तशी आघाडी काँग्रेस पक्षाशिवाय शक्य नाही. कारण इतर पक्ष हे त्या त्या राज्यापुरते मर्यादित आहेत. आणि काँग्रेस हा देशातील पक्ष आहे. त्याचे अस्तित्व हे संपूर्ण देशात आहे. काँग्रेसला सोडून कोणीही जर अशा पद्धतीची आघाडी केली तर, ती अप्रत्यक्षपणे मोदींना मदत होईल, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ममता बॅनर्जींना नेता व्हायचे आहे तर, त्यांनी व्हावे

ममता बॅनर्जी या पूर्वी भाजपच्या सहकारी होत्या, त्यामुळे पुन्हा त्यांना भाजपला सहकार्य करण्यात काही अडचण नाही. त्यांना नेता व्हायचे असेल तर, त्यांनी व्हावे. त्यांच्या राजकीय अपेक्षा असतील तर, ते त्यांनी पूर्ण कराव्या. पण, आज मोदींविरोधात जे काही सर्वपक्षीय एकजूट होण्याचे प्रयत्न करत आहे ते त्यांना विक करण्याचे काम करत आहेत. आणि त्यात फक्त मोदींचाच फायदा होईल, असे देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा - Compensation for Livestock : अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास तात्काळ नुकसानभरपाई देणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.