ETV Bharat / city

"एकहाती सत्ता असूनही पुण्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात भाजप अपयशी"

author img

By

Published : Jul 4, 2020, 5:42 PM IST

भारतीय जनता पक्षाला पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळता आलेली नाही. कोणतीही भरीव तरतूद करता आली नाही. महत्वाच्या आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यास आरोग्य प्रमुख असफल झाले असून त्यांची नियुक्ती देखील निकषांनुसार झालेली नाही. त्यामुळे पुण्यात आरोग्य विषयक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

pune congress
पुणे काँग्रेस

पुणे - शहरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात एकहाती सत्ता असुन देखील भाजप कमी पडत आहे. शहरात कोरोनाबाबत उपाययोजना करण्यास पुणे मनपा आरोग्य प्रमुख असफल ठरत आहे. तसेच आरोग्य प्रमुखांची नेमकी भूमिका काय, हे कळत नसून त्यांची सर्व कामे आणि कर्तव्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हेच पार पाडत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज (शनिवार) पुण्यातील पुणे श्रमिक पत्रकार संघातील सभागृहात हा आरोप केला.

पुणे शहरात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शहराची माहिती असलेला, स्थानिक, सक्षम, स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखांच्या नियुक्तीबाबत आपण राज्य सरकारकडे केल्याचे गोपाळ तिवारी यांनी यावेळी सांगीतले. यावेळी पुणे मनपा काॅंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल हे देखील ऊपस्थित होते.

संपुर्ण सत्ता असूनही पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भाजप अपयशी... काँग्रेसचा आरोप

हेही वाचा - शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीत खडखडाट; मंत्र्यांच्या गाड्यांसाठी उधळपट्टी

पुणे महानगरपालिकेचे डॉ. रामचंद्र हंकारे हे आरोग्य प्रमुख पदास न्याय देण्यास असमर्थ आहेत. आरोग्य प्रमुखांनी मार्च महिन्यात अंदाज पत्रकात आग्रही वाढीव तरतूद करायला हवी होती. खासगी रुग्णालयांशी करार करण्यासारख्या गोष्टींमध्ये देखील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना लक्ष घालावे लागत आहेत. पुणे मनपा आरोग्य प्रमुखांनी मनपाच्या आरोग्य यंत्रणा आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक लक्ष देऊन त्या सक्षम करणे गरजेचे आहे. मात्र, एकंदरीत आढावा घेतल्यास त्यांचा कल खासगी रुग्णालयांकडे असल्याचे प्रत्ययास येते, असेही गोपाळ तिवारी यांनी सांगितले.

महापालिकेने कोरोना परिस्थितीत निवृत्त आणि माजी आरोग्य प्रमुख अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली नाही. कोरोना विषयक हेल्पलाईन प्रभावी ठरलेली नाही. हेल्प लाईन विविध रुग्णालयांचा अंतर्भाव असलेल्या डॅशबोर्डला जोडल्यानंतर जाहिरात करण्यात आली नाही. सरकारी, निमसरकारी रुग्णालयांऐवजी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. आरोग्य विषयक उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र व सक्षम कार्यकारी अधिकारी देखील नेमला जावा, अशी मागणी गोपाळ तिवारी यांनी केली.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

नागरिकांचे समुपदेशन करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मनपाने लोकांची कोरोना विषयक भिती घालवण्याबाबत सकारात्मक विचार आणि प्रबोधने यांच्या ॲाडीओ आणि व्हिडिओ क्लिप पाठवणे, रूग्णांचे ‘मानसिक स्वास्थ्य’ वाढवण्याबाबत समुपदेशन करणे, हे देखील औषधाएवढेच गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबईतील कोरोना संक्रमण आटोक्यात येत असताना पुण्यात साथ वाढत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात भाजप आणि महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. महापौर वगळता भाजपचे कोणीही काम करताना दिसत नाही, असा आरोप काँग्रेस गट नेते आबा बागूल यांनी यावेळी केला. कोरोना होऊ नये, यासाठी वेगळी यंत्रणा पालिकेने केली पाहिजे. २४ तासांची अधिक प्रभावी “हेल्प लाईन” ऊभी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना झाल्यावर करावयाच्या उपाययोजनांसाठी स्वतंत्र यंत्रणा पालिकेने उभी केली पाहिजे. भाजपने, प्रशासनाने सर्व पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांना एकत्र विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. कोरोनाची प्रतिबंधक लस येत नाही, तोपर्यंत पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे घरोघरी पोचवली पाहिजे, असे काँग्रेस गटनेते आबा बागूल यांनी सांगितले.

हेही वाचा - कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.