पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रमावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांनी वेळ न दिल्यामुळे आजचा कार्यक्रम होऊ शकला नाही (Savitribai Phule Birth Anniversary 2022) असा आरोप विद्यार्थ्यांनी करत आज पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुरक्षारक्षक आणि विद्यार्थी यांच्यात झटापट झाली.सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थीची अडवणूक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना स्टुडन्ट हेलपिंग हॅन्ड तसेच युवा सेनेच्या विद्यार्थी या संघटना या आंदोलनात सहभागी झाले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.या पुतळ्याचा उदघाटन हे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार होता असं विद्यार्थी संघटनेच्यावतीने सांगण्यात येत आहे.मात्र राज्यपाल यांच्या वेळेचं नियोजन न झाल्याने आजचा उदघाटणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला यावर विद्यार्थी संघटनाआक्रमक झाले असून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आज पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळी विद्यार्थी संघटनेच्यावतीने राज्यपाल तसेच विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यपालांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आम्हीच त्यांना उशिरा कळवलं होतं, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते
छगन भुजबळ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. 3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावं हा आमचा प्रयत्न होता. पण एक महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिलं. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हतं. काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नसतं तर? राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असं ते म्हणाले. आता 9 तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल. आणखी 8 दिवस मिळताहेत चांगलं काम करू. राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. 2 ते 4 दिवसांनी राज्यपाल येतील त्याने काही फरक पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - Savitribai Phule Birth Anniversary 2022 : हरी नरके यांनी उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट