पुणे : चांदणी चौकातील पुल (bridge in Chandni Chowk) पाडण्यासंदर्भात पुल पाडण्याच्या कामाची पूर्व तयारी केली आहे. 2 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजता पुल पाडला (bridge demolished in 6 seconds on October 2) जाणार, असल्याची महिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे.
2 ऑक्टोबरला 6 सेकंदात पाडणार चांदणी चौकातील ब्रीज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुल पाडण्याच्या कामाची पूर्व तयारी केली आहे. भूसंपादन, रात्रीची वाहतूक सुरळीत होणे ही कामे आहेत. १५ सप्टेंबर रोजी पुल पाडला जाणार होता, परंतु पाऊस पडल्यामुळे तो पुढे गेला मागील काही दिवसात नियोजन बैठक झाल्या. आज अंतिम तयारी झाली. पुल पाडण्यासाठी एडिफिस या कंपनीची निवड केली (bridge in Chandni Chowk will demolished) आहे.
एडिफिस पाडणार पुल - 1ऑक्टोबर 2022 रात्री 11 ते 2ऑक्टोबर सकाळी 8 मार्ग बंद असेल. 2 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजता पुल पाडला जाणार आहे. तिथल्या काही इमारती निर्मनुष्य केल्या जातील स्फोट करण्याच्या प्रक्रियेत ४ लोकं असतील. ब्लास्ट डिझायनर, इंजिनियर आणि पोलिस अधिकारी तिथे उपस्थित असतील. 2 तारखेच्या सकाळी 8 नंतर पुन्हा वाहतुक सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख पत्रकार परिषदेत दिली (Collector Rajesh Deshmukh informed) आहे.