ETV Bharat / city

'सातबारा'मतीकर विरुद्ध चौकीदार ही खरी लढाई - मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका

तुम्ही बारामतीत परिवर्तन घडवा, आम्ही तुमच्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बारामतीकरांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 14, 2019, 12:49 AM IST

Updated : Apr 14, 2019, 1:26 AM IST

पुणे - खरंतर ही लढाई 'सातबारा'मतीकर विरुद्ध चौकीदार अशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सुपे गावामध्ये आले होते. यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नीरा-कऱ्हे प्रकल्प रखडलेला आहे. तुम्ही बारामतीत परिवर्तन घडवा, आम्ही तुमच्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी बारामतीकरांना दिले.

कांचन कुल यांच्या विजयासाठी भाजपचा प्रचार-
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत थेट राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी भाजपने कांचन कुल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्या दौंडचे रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. त्यांचे पवार कुटुंबियांशी घरगुती संबंध आहेत. कांचन कुल यांच्या विरोधात निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या आहेत.

Intro:पुणे - खरंतर ही लढाई 'सातबारा'मतीकर विरुद्ध चौकीदार अशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या सभेत पवारांवर टीका केली आहे.Body:बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या सुपे गावामध्ये आले होते. यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नीरा-कऱ्हे प्रकल्प रखडलेला आहे. तुम्ही बारामतीत परिवर्तन घडवा, आम्ही तुमच्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बारामतीकरांना दिले आहे.Conclusion:
Last Updated : Apr 14, 2019, 1:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.