ETV Bharat / city

Eknath Shinde :पुण्यात शिवसैनिक आक्रमक; बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन - शिवसेना

शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे. पुण्यातही आज शिवसैनिकांच्यावतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांच्या फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आल आहे.

Shiv Sainik aggressive
शिवसैनिक आक्रमक
author img

By

Published : Jun 26, 2022, 1:11 PM IST

पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे. पुण्यातही आज शिवसैनिकांच्यावतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांच्या फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आल आहे. एकनाथ शिंदे हा माणूस गद्दार आहे. आम्ही सर्वजण हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामागे उभे आहोत. असे यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी म्हटल आहे. पुण्यात देखील शिवसेनेत फूट पडली असून शिवसैनिक राजाभाऊ भिलारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. त्यावर थरकुडे यांना विचारले असता ते म्हणाले की, पुण्यात कुठलीही फूट पडलेली नाही.जो कोणी शिंदे गटात सहभागी झाले आहे त्यामागे किती लोक आहेत. हे देखील पाहावे असे थरकूडे म्हणाले. यावेळी आक्रमक शिवसैनिकांच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणबाजीही करण्यात आली.

हेही वाचा - शिवसेनेची बंडखोरांबाबत कठोर भूमिका; वाचा, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शिवसेना बंडखोरांवर निशाणा ( Sanjay Raut tweet ) साधला आहे. किती दिवस गुवाहाटीत राहणार आहात, महाराष्ट्रात यावे लागेलच, असे त्यांनी ट्विटमध्ये सूचित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ ( Narahari Zirwal lateste news ) यांचा ऐटबाज असलेला फोटो टाकत बंडखोरांना डिवचले आहे.

हेही वाचा - Teesta Setalvad: मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाट यांना अटक; गुजरातला हलवले

बंडखोरांवर कारवाई - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी बंडखोरांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. कारवाईचे सर्वाधिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. लवकरच ते निर्णय जाहीर करतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. बंडखोरांनी त्यानंतर हॉटेल रेडिसन ब्लू बुकिंग आणखीन काही दिवस वाढवून घेतले. संजय राऊत यांनी यावरून आज सकाळी नवे ट्विट करत बंडखोरांना लक्ष केले. 'किती दिवस लपणार गुवाहाटीमध्ये एक दिवस यावे लागेल चौपाटीमध्ये अशा शब्दांत निशाणा साधला. ट्विटमध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो वापरला आहे. फोटोत अध्यक्ष झिरवाळ एक हात कमरेवर ठेवून वाट बघत असल्याचे दिसत आहे. बंडखोरांच्या प्रतीक्षेत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असल्याचे या फोटोतून भासवण्याचा राऊत यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे ट्विट जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा - काय सांगता?.. एका नवरा, बायका 12! आता 13 व्या लग्नाच्या तयारीत असताना फुटले भांडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.