पुणे - 'एनआरसी' आणि 'कॅबट हे दोन्ही घटनाबाह्य आहेत. यामुळे देशातील बंधुभाव नष्ट होईल. देश अशांत होऊन देशाच्या विकासावर परिणाम होईल, अशी भीती महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील माजी आयपीएस आधिकारी अब्दूर रहमान यांनी व्यक्त केली. अब्दुर रहमान यांनी नुकताच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
हेही वाचा... #CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा बंद
पुण्यात रविवारी माजी खासदार अली अन्वर लिखित दलित मुस्लिम, दलित मुसलमान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पाडला. या कार्यक्रमासाठी अब्दुर रहमान हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा... हेक्टरी २५ हजारांची मदत तत्काळ करावी, फडणवीसांची मागणी
अब्दुर रहमान म्हणाले, हा कायदा लागू झाला तर भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी कामधंदा सोडून रांगेत उभे रहावे लागेल. यामुळे देशाच्या विकासात कुठेतरी अडथळा निर्माण होईल. त्यामुळेच मी राजीनामा दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानाविरोधी आहे. या कायद्यामुळे मुस्लीम समाजाला बाहेर काढले जात आहे. उद्या इतर धर्मियांनाही असा कायदा लागू करणार नाहीत हे कशावरून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा... नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार करू - उद्धव ठाकरे
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अब्दूर रहमान यांनी दिलाय राजीनामा...
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील आयपीएस आधिकारी अब्दूर रहमान यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ तडकाफडकी राजीनामा दिला आहे. रहमान यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पोस्ट केला आहे. रहमान यांच्या राजीनाम्यामुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. अब्दूर रहमान १९९७ बँचचे आयपीएस अधिकारी आहेत. अब्दूर रहमान यांची वायरलेस उपमहानिरीक्षक पदावररुन बढती होऊन मानवी हक्क आयोगाचे महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती.