ETV Bharat / city

'लॉकडाऊन अगेन'नंतर पुण्यात पुन्हा रांगा; किराणा, भाजीपाला, वाईन शॉपबाहेर गर्दी - Pune latest news

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

lockdown in pune
लॉकडाऊन पुणे
author img

By

Published : Jul 10, 2020, 8:19 PM IST

पुणे - दिनांक 13 जुलै ते 23 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. नागरिकांनी येत्या 3 दिवसांत खरेदी करून घ्या, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. तसेच या 10 दिवसांच्या काळात कडक लॉकडाऊन असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही घोषणा होताच पुण्यात किराणा, भाजीपाला, वाईन शॉपबाहेर गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे.

लॉकडाऊनच्या या काळात पहिले पाच दिवस दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन अगेनच्या घोषणेनंतर पुण्यात किराणा, भाजीपाला, वाईन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

हेही वाचा - पुण्यात 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 'लॉकडाऊन'

मात्र, निर्णय घेतल्यानंतर पुण्यात नागरिकांनी वस्तूंच्या खरेदीसाठी तसेच पालेभाज्या खरेदीसाठी दुकानाबाहेर रांगा लावल्या आहे. लॉकडाऊनमध्ये जशा मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच काहीसे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन मध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असणार असल्याने नागरिक विविध वस्तू खरेदीसाठी दुकाननबाहेर गर्दी करत आहे. जो त्रास लॉकडाऊनमध्ये झाला तो होऊ नये, यासाठी म्हणून पुणेकर किराणा सामान, भाजीपाला आणि इतर साहित्य खरेदी करून घेत आहेत.

वाईनशॉपच्या दुकानाबाहेरही नागरिकांच्या रांगा...

सुरूवातीला लॉकडाऊनमध्ये जो त्रास तळीरामांना झाला तो पुन्हा या दहा दिवसात होऊ नये, तसेच 20 तारखेनंतर श्रावण महिना सुरु होत असल्याने अनेकजण आखाड पार्टीची सोय आजच करुन घेताना दिसत होते. शहरात विविध ठिकाणी वाईन शॉपबाहेर भली मोठी रांग लाऊन लोक अमर्यादित दारूसाठा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत होते.

पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. यापैकी १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर ९०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसेंगणिक पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.