पुणे वेदांता समूह (vedanta group) आणि फॉक्सकॉन (foxcon) यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळती (Investment shifts to Gujarat) झाली आहे. या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे लाखो नोकऱ्या आणि कोट्यवधींच्या महसूलाला महाराष्ट्र मुकला आहे. या प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांता समुहाने जाहीर केले आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश (Failure of Shinde-Fadnavis government) असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता प्रकल्प भाजपच्या काळात गुजरातला स्थलांतरीत झाला हे धादांत खोटं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (sppu) यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' (Participation of transgenders in democracy) या विषयावर विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळेंची वेदांतावरुन टिका (Supriya Sule on Vedanta) सुप्रिया सुळे यांनी वेदांता प्रोजेक्ट वरून शिंदे सरकारवर टिका केली आहे. यावर वाघ यांना विचारलं असता त्या म्हणाले की सुप्रिया सुळे खूप मोठ्या नेत्या आहे. त्या काहीही बोलु शकतात. मागचं सरकार बंगल्यात बसून आणि फेसबुकवरती चालवल गेलं. आणि आत्ता हे सरकार लोकांत मिसळणार आहे. त्यामुळे त्यांना ते दोन वर्षांची सवय नाहीये. त्यामुळे असे आरोप करत आहेत. असा टोला यावेळी चित्रा वाघ यांनी सुळे यांना लगावला आहे.
भाजप नेते गणेश बिडकर यांच्या फार्म हाऊसवर एका अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणांकडून अत्याचार करण्यात आले आहेत. याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की बीडकर यांनी पूर्ण सहकार्य केलं आहे. तृप्ती देसाई जे सांगत आहेत, की फास्ट ट्रॅक वर चालवा पण फास्ट ट्रॅक कोर्टचं नाही. असही त्या म्हणाल्या.