ETV Bharat / city

आता थेट रश्मी ठाकरे यांनाच पत्र लिहितो... हिच का तुमची भाषा? - chandrakant patil on rashmi thackeray

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर करून त्याला संभाजीनगर नाव देण्याची शिवसेनेची मागणी आहे. सध्या याच नामांतरावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यातूनच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

चंद्रकांत पाटील बातम्या
आता थेट रश्मी ठाकरे यांनाच पत्र लिहितो... हिच का तुमची भाषा का?
author img

By

Published : Jan 1, 2021, 1:16 PM IST

Updated : Jan 1, 2021, 3:15 PM IST

पुणे - मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादचे नामांतर करून त्याला संभाजीनगर नाव देण्याची शिवसेनेची मागणी आहे. सध्या याच नामांतरावरून चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रस्ताव लवकरच तयार होणार असल्याचे संकेत काही मंत्र्यांनी दिले आहेत. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीनगर हा मुद्दा पक्षासाठी केवळ राजकारणापुरता नसून भावनिक विषय असल्याचे सांगितले. याच विषयावरून माझ्यावर 'सामना'त गलिच्छ शब्दात टीका झाली, असे ते म्हणाले. मात्र हिच तुमची भाषा आहे का, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. तसेच यासंबंधी 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता थेट रश्मी ठाकरे यांनाच पत्र लिहितो... हिच का तुमची भाषा का?

नामांतर प्रकरणाला सत्ताधारी काँग्रेसने विरोध नोंदवला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यांनीही नामांतराच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाची बाजू मांडली. मात्र यावरून काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का, असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मात्र, त्याला विरोध असल्यास कमीतकमी औरंगजेबाचे नाव हटवा, असे पाटील म्हणाले.

आता थेट ठाकरे वहिनींना पत्र

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती. त्यावर चंद्रकांत पाटील थेट संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे बोलले. सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. हि भाषा अग्रलेखात कशी वापरण्यात आली, असा सवाल त्यांनी केला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर कराव, ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांचीही होती. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते, त्यावेळी बाळासाहेबांनी ही मागणी केल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे.

नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेसही ठाम

मागील वर्षभरापासून शिवसेनेचे पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री असूनही औरंगाबादचे नाव अद्याप बदललेले नाही. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारल्यानंतर त्यांनी नामांतराला विरोध असल्याचे सांगत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, मात्र नामांतरच्या मुद्याला आमचा कायम विरोध राहिल, असे थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडीत कॉमन मिनीमम प्रोग्रॅम ठरला आहे. त्यामुळे जेव्हा नामांतराचा प्रस्ताव समोर येईल, त्यावेळी आम्ही विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jan 1, 2021, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.