ETV Bharat / city

शरद पवार गॉडफादर, सरकारवर कंट्रोल तरी आरक्षण का नाही? - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका

पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकले नाही, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jun 3, 2021, 3:27 PM IST

Updated : Jun 3, 2021, 5:36 PM IST

पुणे - शरद पवार हे राष्ट्रवादीचे आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर आहेत. त्यामुळेच पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकले नाही, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे.

माहिती देताना चंद्रकांत पाटील

पडळकरांनी जी भूमिका मांडली आहे त्यात तथ्य आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. त्यांचा राज्य सरकारवर कंट्रोल आहे, तरीही आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेला निकाल पाहिला तर या महाविकास आघाडी सरकारने काय काय चुका केल्या हे त्या अहवालाच्या पानापानांवर दिसून येत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

हेही वाचा - ठाण्यात हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, २ प्रसिद्ध अभिनेत्रींसह ५ अटकेत, १ लाख ८० हजारात झाला होता सौदा

  • पवारांचा राज्य सरकारवर कंट्रोल तरी आरक्षण नाही?

माझी डिबेट करायची तयारी आहे. मी निकाल वाचला आहे, त्यात पाऊलापाऊलांवर जाणवते की चुका आहेत. या सरकारने ऑर्डिनन्सचा कायदा केला नाही, असे पाटील म्हणाले. पुण्यात गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील बोलत होते.

  • पवारांच्या तब्येतीच चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले होते -

३ जूनला कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मुंडेंचे निधन झाले. आज ७ वर्ष झाली आहेत. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली असे सांगत पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या स्मृती जागवल्या. आताही भाजपचा संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष कधीच संपणार नाही, असे पाटील म्हणाले. दरम्यान, पवार फडणवीस भेटीवरही त्यांनी भाष्य केले. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरू आहेत. पवार आजारी आहेत, त्यांची चौकशी करायला फडणवीस गेले होते, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा - शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स सुरुवातीला 350 अंकांनी वधारला

Last Updated : Jun 3, 2021, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.