ETV Bharat / city

Chandrakant Patil Allegations : महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात फक्त पैसे कमवण्याचे काम केले - चंद्रकांत पाटील - महाविकास आघाडी सरकार 2 वर्षे

2 वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा ( Mahavikas Aghadi Government ) कारभार हा भ्रष्टाचार, गोंधळ, अनागोंधी अशा पद्धतीने चालला आहे. गेल्या 2 वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यावर हायकोर्टाने त्यांना ठोकले आहे. एकही निर्णय या सरकारचा कोर्टात टिकलेला नाही. तरी देखील हे लोक बेमुरवतपणे सरकार चालवत आहे. एक समाजाचा घटक संतुष्ट आहे, असे दाखवले तर सरकारचे आपण अभिनंदन करू, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा लोक हे सरकार फेकून देतील यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, अशी टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 28, 2021, 3:54 PM IST

Updated : Nov 28, 2021, 4:34 PM IST

पुणे - 2 वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा ( Mahavikas Aghadi Government ) कारभार हा भ्रष्टाचार, गोंधळ, अनागोंधी अशा पद्धतीने चालला आहे. गेल्या 2 वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यावर हायकोर्टाने त्यांना ठोकले आहे. एकही निर्णय या सरकारचा कोर्टात टिकलेला नाही. तरी देखील हे लोक बेमुरवतपणे सरकार चालवत आहे. एक समाजाचा घटक संतुष्ट आहे, असे दाखवले तर सरकारचे आपण अभिनंदन करू, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा लोक हे सरकार फेकून देतील यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. शिवाय दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने फक्त पैसे कमवण्याचे काम केले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी संवाद साधतांना

राज्यातील एकूण मंत्रिमंडळातील एक चतुर्थांश मंत्री हे कुठल्याना कुठल्या आरोपाखाली चौकशीच्या फेऱ्यात आहे. दोन मंत्र्यांचा राजीनामा हा झालेला आहे. बाकीचे मंत्री हे नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे ते देत नाही. कोणावर महिलांशी संबंध ठेवल्याच आरोप आहे. अशा पद्धतीने या सरकारचे खुल्या पद्धतीने मोघलाई सुरू आहे. आज 23 दिवस सतत सुरू असलेल्या एसटी संपात लक्ष न घातलेले हे सरकार आहे. आरक्षणाच्या बाबतीत देखील मराठा समाजाच्या ( Maratha Reservation Issue ) तोंडाला पाणी पुसण्याचे काम या सरकारने केले आहे, असे पाटील म्हणाले.

'2 वर्षात एकही विकास काम नाही फक्त पैसे कमवले'

2 वर्षाच्या कालावधीत एकही विकास काम झालेले नाही. रस्त्याची कामे पडून आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यांना नुकसानभरपाई मिळालेले नाही. या 2 वर्षात फक्त एक धंदा जोरात सुरू झाला आहे, तो म्हणजे पैसे कमवा ते ही मोठ्या प्रमाणात. या 2 वर्षात पैसे कमवण्याच काम या सरकारने केले आहे. आम्ही विरोधीपक्ष आहोत म्हणून सांगत नाही, तर वेगवेगळ्या संस्था संघटनांचे अधिकारी हे आरोप करत आहे. 2 वर्षात न चुकता झालेला काम म्हणजे भ्रष्टाचार आणि तो नियमितपणे सुरू होता. आज राज्याची अशी परिस्थिती निर्माण झाली आहेस की व्यवस्थापन हे पूर्णपणे कोसळले आहे. ज्या मुंबई पोलिसांची ख्याती जगभर होती, त्या मुंबई पोलीस आयुक्त परागंदा झाले होते. ते काल प्रकट झाले आहे, अशी टीका देखील यावेळी पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - 2 Years Complete MVA Govt : ...हा विनोदच! आजही सरकार पाडण्याची तारीख देतायेत; सामनातून टीका

Last Updated : Nov 28, 2021, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.