ETV Bharat / city

आजपासून 10 नोव्हेंबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता - राज्यात मुसळधार पाऊस

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील या प्रदेशात पोषक हवामान तयार होत असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी वातावरणाचा अंदाज घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन केले आहे.

chance-of-torrential-rains-with-thunderstorms-in-the-state-from-today-till-november-10
आजपासून 10 नोव्हेंबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
author img

By

Published : Nov 1, 2021, 3:19 PM IST

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे त्यामुळे काही प्रमाणात थंडीची चाहूल जाणवू लागली होती. मात्र आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

या भागात सतर्कतेचा इशारा -

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील या प्रदेशात पोषक हवामान तयार होत असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी वातावरणाचा अंदाज घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन केले आहे.

चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण -

२५ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून यंदाचा मान्सूनने माघार घेतली असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले होते. या कालावधीत एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने पश्चिम दिशेने सरकला असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या शक्यतेची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या भागात 2 नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज -

दरम्यान, कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी 2 नोव्हेंबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

रब्बीच्या पेरण्या लांबणीवर!

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे. मात्र, पेरणी होताच पाऊस झाला तर पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती. अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - जलयुक्त शिवारामुळे भूजल पातळी वाढली - पंजाबराव डख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.