पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च रोजी राज्यातील महविकास आघाडी सरकार नक्की पडणार असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ( Chhagan Bhujbal on Chandrakant Patil ) 'जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले?' अशा शब्दात पाटलांना टोला लगावला आहे .
भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. त्यावर भुजबळ यांनी मुख्यमंत्री असेल धंदे करत नाहीत. पुणे महापालिकेत जे घडल ते अपघाताने घडल असे देखील भुजबळ यांनी सांगितलं. तसेच देशात मोदी सरकार हे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सीबीआय तसेच इडीचा वापर करत आहे, असा टोला देखील छगन भुजबळ यांनी मोदी सरकारला लगावला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च नंतर महाविकास आघाडी सरकार जाणार असा दावा केला होता. महाविकास आघाडीतील मंत्री एकामागोमाग एक घोटाळ्यात अडकत असल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा -Anna's movement : सरकारच्या पत्रानंतर अण्णा हजारेंनी उपोषण केले स्थगित