पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नसल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर ( Amit Shah criticism on Congress ) केली. काँग्रेसची सत्ता असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब दिला गेला नाही. तो देण्याचे काम हे बिगर काँग्रेसी सरकारनेच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पण, त्याला काँग्रेस विरोध करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडून संसदेत येऊ, नये यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या राज्यघटनेवरच मोदी सरकार देश चालवत आहेत, असेही यावेळी शाह म्हणाले.
पुणे महापालिकेच्या ( PMC ) विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शाह ( Amit Shah Pune Visit ) यांच्या हस्ते रविवारी (दि. 19 डिसेंबर) पार पडले. यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश कर आदी यावेळी उपस्थित होते.
म्हणून आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ राज्यघटना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमधील योगदानाविषयी शाह म्हणाले, “पूर्ण जीवनात त्यांना अवहेलना, अपमान सहन करावे लागले. पण, त्याचा परिणाम त्यांनी घटनानिर्मिती करताना होऊ दिला नाही. देशातील प्रत्येक नागरिकाचे अधिकार हे अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले. यामुळे आपल्या देशाची राज्यघटना ही देशातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. परंतु, आज त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जिंवत असताना आणि नंतरही त्यांचा अपमानच केला आहे, असे यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Central Home Minster Amit Shah ) म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पुढे सुरुच राहिले
स्वराज्य आणि स्वधर्म हे दोन शब्द उच्चारण्याची भीती वाटावी, अशा परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्यासाठी संपूर्ण जीवनाचे योगदान दिल्याचे त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. सैन्याचे अत्याधुनिकीकरण, नौदलाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही स्वराज्याचे कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू ठेवले, असेही यावेळी शाह म्हणाले.
संविधान मजबूत करण्यासाठी मोदी शाह काम करत आहेत - आठवले
संविधान मजबूत करण्यासाठी मोदी व शाह काम करत आहेत. ते धोक्यात असल्याच्या चर्चा केल्या जातात. पण, तसे काही नाही. आरक्षणावर गदा असल्याचे म्हटले जाते. पण, तसेही काही नसल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र मोठे करण्याचे काम आमचे सरकार करेल, असा विश्वास यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State Ramdas Athawale ) यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा - Amit Shah in Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र