पुणे - देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी देशभरातील शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिव मंदिरांमध्ये भाविकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिव मंदिरात महाशिवरात्री साजरी केली जात आहे. पुण्यात देखील महाशिवरात्र उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, भाविकांना या ठिकाणी यायला परवानगी दिली नाही. पुण्यातील वासुदेव निवास येथे देखील दरवर्षी महाशिवरात्र साजरी केली जात असते. यंदाही पुण्यातील वासुदेव निवासमध्ये महाशिवरात्री निमित्ताने चातुर्याम पूजा केली जाते.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा करणारे कोल्हापुरातले अनोखे गाव
वासुदेव निवासमध्ये श्री नरसिंह सरस्वतींच्या प्रसाद पादुका आहेत. यावर अभिषेक केला जातो. सकाळी पावणे सात ते पावणे नऊपर्यंत पहिला याम येथे पार पडला. त्यानंतर सव्वा नऊ ते पावणे बारापर्यंत दुसरा याम झाला. पावणे बारा ते सव्वा दोन या वेळेत तिसरा याम आणि सव्वा दोन ते रात्री पावणे दोनपर्यंत चौथा याम असणार आहे. दरम्यान, सध्या कोरोना संसर्गामुळे सरकारचे निर्बंध आहेत. त्यामुळे सर्व भाविकांनी घरीच शिवयोग, शिवपूजन करून महाशिवरात्रीचा आनंद घ्यावा, असे आवाहन वासुदेव निवासचे भागवताचार्य शरद शास्त्री जोशी यांनी केले आहे.
हेही वाचा - खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूस 'या' लोकांना धरले जबाबदार; मुलाची पोलिसात तक्रार