ETV Bharat / city

पुण्यात ब्राह्मण महासंघाने मंदिरे उघडल्याचा आनंद कसबा गणपतीसमोर बँड वाजवून केला साजरा - पुण्यातचे ग्रामदैवत कसबा गणपती

सोमवारी पहाटेपासूनच राज्यभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे शहरात ब्राह्मण महासंघाच्या वतीने कसबा गणपतीची आरती करुन आनंद व्यक्त करण्यात आला.

kasba-ganapati-in-pune
कसबा गणपती मंदिरात बँड वाजवून आनंद साजरा...
author img

By

Published : Nov 16, 2020, 3:54 PM IST

पुणे - राज्यातील मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यानंतर सोमवारी पहाटेपासूनच राज्यभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. पुणे शहरातदेखील मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर खुली होत असताना मंदिराबाहेर फटाके, वाजंत्री वाजवत, महाआरती करत मंदिर खुले होण्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. पुण्यातल्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाआरती करण्यात आली.

कसबा गणपती मंदिरात बँड वाजवून आनंद साजरा..

हेही वाचा - दिलासादायक..! मुंबईतील चार विभागातील रुग्ण दुपटीचा दर 400 दिवसांच्या पार

ब्राह्मण महासंघाकडून आनंद साजरा...

राज्यातील मंदिरे खुली करावी यासाठी ब्राह्मण महासंघाने सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली होत असल्याने ब्राह्मण महासंघाने या निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. कसबा गणपतीच्या मंदिराबाहेर रांगोळी काढत, मंदिर सजवत तसेच बँड पथकासह या ठिकाणी ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी कसबा गणपती समोर राज्यात पुन्हा मंदिरे खुली होत असल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा - LIVE : पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली जातायत राज्यातील प्रार्थनास्थळे..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.