ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte Case Pune : मुंबई, सातारा, कोल्हापूर पाठोपाठ आता पुण्यात सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल - भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे सदावर्ते गुन्हा दाखल

पुणे पोलीस सदावर्ते ( Case register against Gunaratna Sadavarte in Pune ) यांना अटक करण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे. २०२० साली पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये ( Bharti University Police Station ) त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदावर्ते
सदावर्ते
author img

By

Published : Apr 15, 2022, 9:22 PM IST

पुणे - वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सातारा पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज (शुक्रवारी) न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता यानंतर पुणे पोलीस देखील सदावर्ते ( Case register against Gunaratna Sadavarte in Pune ) यांना अटक करण्याचा तयारीत असल्याचे दिसून येत आहे. २०२० साली पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये ( Bharti University Police Station ) त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये 9 सप्टेंबर 2020 रोजी, अमर पवार यांनी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिली होती. अमर पवार हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत.

काय आहे प्रकरण? : गुणरत्न सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करू सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पाती मधे तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांचे विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीसही या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - Gunaratna Sadavarte Case Kolhapur : मुंबई, सातारानंतर आता कोल्हापुरातही सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.