पुणे/मावळ - ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात भाजपा राज्यामध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यामध्ये विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर देखील आंदोलन करत एक तास महामार्ग भाजपा आंदोलकांकडून रोखून धरला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याते आले.
90 ते 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्यासह एकूण 90 ते 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यभर आज भाजपाकडून आंदोलन
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभर राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक राज्यसरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील नेते लोणावळा या ठिकाणी ओबीसी चिंतन बैठक घेत आहेत. दरम्यान, आज राज्यभर भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. त्यात, पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर देखील मावळ भाजपाकडून रस्तारोको करत एक तास रोखून धरत आंदोलन केले. दरम्यान, कोरोना नियमांना धाब्यावर बसवत हे आंदोलन केल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंदोलकांवर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. यात, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह तालुका अध्यक्षांचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजन यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्याची सूत्रे आमच्या हाती दिल्यास तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण देऊ; अन्यथा राजकीय संन्यास घेईल - फडणवीस