पुणे - महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे हेमंत रासने यांना 10 तर महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू गायकवाड यांना 6 मते मिळाली आहे. तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदीही भाजपाच्या उमेदवार मंजुश्री खर्डेकर यांचा विजय झाला आहे.
विरोधकांनी पुण्याच्या विकासासाठी मदत करावी -
विरोधकांनी विरोधाची पारंपरिक भूमिका सोडून द्यावी आणि पुणे शहराच्या विकासात आम्हला मदत करावी. जगाच्या नकाशावर जी सर्वोत्कृष्ठ शहरे आहेत, त्या शहरांच्या पंक्तीत जायची क्षमता या पूणे शहराची आहे. महापालिकेने पूर्ण क्षमतेने याचा वापर केला तर आपण जगातील सर्वोत्कृष्ट दहा शहरांमध्ये जाऊ शकतो, असेही यावेळी हेमंत रासने म्हणाले.
हेही वाचा - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला दिलासा